कंगना राणावतची संजय राऊतांवर जहरी टीका


मुंबई – पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर अभिनेत्री कंगना राणावतने निशाणा साधला आहे. यासंदर्भात तिने एक ट्विट केले असून आपल्या ट्विटमध्ये तिने हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटाशी संबंधीत बातमी शेअर करत लिहिले की, सध्या मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचा हिमाचल पाहुणचार करत आहे. प्रत्येक भारतीयाची देव भूमी आहे आणि जर या राज्यातून कुणी पैसे कमावत आहे तर त्याला हरामखोर किंवा नमकहराम म्हटले जाणार नाही आणि कुणी असे जर म्हणत असेल तर मी त्याची निंदा करते, बॉलिवूड प्रमाणे शांत राहणार नसल्याचे म्हटले आहे.


कंगनाने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. यासोबतच तिला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा संजय राऊतांवर आरोप लावला होता. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या ट्वीटवर भडकलेल्या संजय राऊतांनी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला हरामखोर मुलगी असे म्हटले होते. यानंतर राऊतांवर टीका झाली तेव्हा ते स्पष्टीकरण देत म्हणाले होते की, हरामखोर म्हणजे नॉटी म्हणालो होतो.