कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमिर खान विरोधात भाजप आमदाराची तक्रार


सध्या आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणात अभिनेता आमिर खान व्यस्त आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. पण आता या चित्रपटाच्या चित्रीकरणावरुन वाद निर्माण झाला असून यासंदर्भात भाजप आमदाराने आमिर खान विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आमिर खानवर लोनीचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. त्याचबरोबर भाजप आमदाराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. गाझियाबादमध्ये आमिर खान चित्रीकरण करत असल्यामुळे चाहते अतिशय खुश होते. आमिरला भेटण्यासाठी चाहते देखील लोकेशनवर पोहोचले. चाहत्यांची आमिरने देखील भेट घेतली. पण त्यावेळी आमिरने मास्क घातला नव्हता. आमिर खानने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आमिर खान विरोधात भाजप आमदाराने तक्रार दाखल केली आहे.