बदलणार बँक ऑफ बडोदा आर्थिक व्यवहाराचे नियम


नवी दिल्ली – बँकांमध्ये दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकने आपल्या नियमात बदल केल्यामुळे आता बँकामधून पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून याची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. यापुढे ग्राहकांना ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास पैसे मोजावे लागणार आहेत.

तीन वेळेपेक्षा अधिक रक्कम लोन खात्यासाठी जे ग्राहक काढतील त्यांना 150 रुपये मोजावे लागणार आहेत. तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील, पण चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास आता ग्राहकांना 40 रुपये मोजावे लागणार आहेत. बँक ऑफ बडोदा हे बदल बँकेचे चालू खाते, ओव्हरड्राफ्ट अकांऊंट, कॅश क्रेडिट अकांऊंट, सेव्हिंग्ज अकांऊंट आणि अन्य अकांऊंटससाठी कॅश जमा आणि पैसे काढण्याच्या सेवांशी संबंधित इतर खात्यांना लागू असणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना 3 वेळेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.