स्थलपद्म फुलांचा अर्क मधुमेहावर गुणकारी

sthal-padma
नवी दिल्ली – मधुमेह हा विकार कधीच दुरुस्त होत नाही. मात्र तो नियंत्रणात ठेवला तर मधुमेहीचे जीवन सुखकर होऊ शकते. तरीही मधुमेहावर औषध शोधण्याचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे. आसामच्या तेजपूर विद्यापीठातील आणि पश्‍चिम बंगालच्या विश्‍व भारती विद्यापीठाच्या संशोधकांनी भारताच्या ईशान्य भागात सापडणार्‍या स्थलपद्म या फुलाचा अर्क मधुमेहावर औषध म्हणून वापरता येऊ शकेल, असा दावा केला आहे.

या संशोधकांनी मधुमेह झालेल्या उंदरावर हा इलाज करून पाहिला. स्थलपद्माच्या फुलाची पाने चुरगाळून त्यांचा अर्क काढला गेला आणि तो त्या उंदरांना खायला दिला. त्या अर्कातील फायटोकेमिकल्स् या प्रकारातील काही आमलांमुळे त्या उंदराच्या रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण आपोआप वाढल्याचे आढळले. त्यावरून अशाच प्रकारे माणसाच्याही रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढवता येऊ शकेल अशी आशा त्यांना वाटत आहे.

विश्‍व भारती विद्यापीठातील जीवन विज्ञान शाखेचे प्रोफेसर समीर भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रक्रियेचे तपशील सांगितले. या अर्कातील फेरुलिक ऍसिड या फायटो केमिकल्स्चा परिणाम इन्शुलिनवर होऊ शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले. एकंदरीत स्थलपद्म या फुलझाडाच्या पानाचा अर्क मधुमेहावर औषध म्हणून उपयोगी पडू शकतो असे ते म्हणाले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment