वेग आणि अचूकता

career
सध्याच्या युगात स्पर्धा परीक्षा, त्यांचे पेपर्स, त्यातली प्रश्‍न विचारण्याची पद्धत या गोष्टीला ङ्गार महत्व आलेले आहे. मात्र वारंवार त्याच त्या प्रकारच्या प्रश्‍नपत्रिका तयार होत असल्यामुळे त्या प्रश्‍नपत्रिकांचे पॅटर्न तयार झाले आहे आणि त्या पॅटर्ननुसार मुले मेड टू साईज अभ्यास करायला लागली आहेत. म्हणून अनेक वेळा प्रश्‍नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होतो. स्वरूप बदलले तरी त्यातून जोखले जाणारे गुण मात्र तेच असतात. काही प्रश्‍नपत्रिकांमध्ये काही प्रश्‍नांची उत्तरे विशिष्ट वेळेत द्यावी लागतात. तिथे उत्तरांची अचूकता आणि उत्तरे शोधण्यातला वेग या दोन गुणांची परीक्षा होत असते. अशा वेळी विद्यार्थी मोठेच संभ्रमात पडतात. ङ्गार वेगाने उत्तरे द्यावीत तर काही उत्तरे चुकण्याची शक्यता असते आणि उत्तरांच्या अचूक-पणावर लक्ष केंद्रित करावे तर कमी प्रश्‍न सोडवले जाऊन वेगाच्या परीक्षेत नापास होण्याची शक्यता असते. तेव्हा वेगाला महत्व द्यावे की अचूकतेला महत्व द्यावे अशा पेचात विद्यार्थी सापडतात. पेपर तपासणारे तपासनीस त्यातल्या कशाला महत्व देतात, असा एक प्रश्‍न सर्वांंना पडलेला असतो. खरे म्हणजे पेपर तपासणारे लोक अचूकतेलाही महत्व देत असतात आणि वेगालाही महत्व देत असतात. या दोन्हींचा सुरेख संगम साधून अचूक परंतु भरपूर उत्तरे सोडवणार्‍याला चांगले गुण मिळतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एखाद्या विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्‍नाचे अचूक उत्तर दिले, परंतु एकूण दिलेली उत्तरे संख्येने ङ्गारच कमी असतील तर त्याला चांगले गुण मिळत नाहीत. म्हणून दिलेल्या एकूण प्रश्‍नांपैकी निश्‍चित वेळेमध्ये ६० ते ७० टक्के प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल आणि सोडवलेल्या प्रश्‍नातील साधारण ८० टक्के उत्तरे बरोबर असतील तर त्याला चांगला उमेदवार समजले जाते. असा स्कोअर गाठण्यासाठी काय करावे? याची एक युक्ती आहे. असे प्रश्‍न साधारणत: बहुपर्यायी प्रश्‍न असतात. मात्र या पर्यायांची रचना एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते. उदा. १६ गुणिले ४ किती? असा प्रश्‍न असतो आणि उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात. त्यातले दोन पर्याय अगदी दुरान्वयानेही बरोबर असण्याची शक्यता नसते. म्हणजे ते दोन पर्याय १३२ किंवा १०४० असे असतात. या दोन्हीतले एकही उत्तर बरोबर येणार नाही हे निश्‍चित. आता उर्वरीत दोन पर्यायांमध्ये ६४ आणि ७१ अशी दोन उत्तरे दिलेली असतात. त्यातला ७१ या पर्यायापेक्षा ६४ हा पर्याय बरोबर असण्याची शक्यता आहे. कारण १६ आणि ४ हे दोन्ही सम आकडे आहेत. त्यांचा गुणाकार सम आकडा येण्याची शक्यता असते. तेव्हा आपण अशातर्‍हेने ६४ आकडा आपल्या मनाशी निश्‍चित झाला की, त्यावर पटकन बरोबर मार्क करावा. या ठिकाणी १६ आणि ४ चा गुणाकार करत बसलो तर वेळ जातो. तेव्हा शक्यता काय आहे हे मनाशी ताडावे. या पद्धतीने एखादे उत्तर चुकेल, परंतु बरोबर उत्तरांची संख्या दिलेल्या वेळेत वाढेल.

Leave a Comment