अस्थमा नियंत्रणात ठेवण्याचे पाच उपाय

asthama
अस्थमा म्हणजे दमा. हा श्‍वासाचा विकार आहे. या विकारामध्ये कफ दाटून येणे, छाती भरून येणे, श्‍वासाला त्रास होणे आणि खोकला येणे असे त्रास होतात. अस्थम्याचा त्रास सर्व वयातल्या रुग्णांना होऊ शकतो, पण सामान्यता तो लहान वयात सुरू होतो. या विकारावर काही उपाय नाही. अस्थमा हे ऍलर्जी सुद्धा आहे. पण तो काही प्रयत्नांनी नियंत्रणात ठेवता येतो. त्यासाठी खालील उपाय करावेत.

व्यायाम – नियमित व्यायाम करण्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि ते चांगला श्‍वास घेऊ शकतात. व्यायामाने हृदय सुद्धा मजबूत होते, ज्यामुळे अस्थम्याची लक्षणे थोडी सौम्य होतात. फळे आणि भाजीपाला खाणे – फळांमध्ये रोगप्रतिकार द्रव्ये असतात. त्यामुळे फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. विशेषत: हवेतून येणारे विषाणू आणि रोगजंतू यांच्या उपद्रवाचा प्रतिकार करण्याची शक्ती फळांतील आणि भाज्यांतील काही विशिष्ट द्रव्याने वाढते.

ओमेगा-३ फॅटी ऍसिड – ओमेगा-३ फॅटी ऍसीड हा अस्थम्याचा त्रास कमी होण्याचा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे. मासे खाणार्‍यांना हे द्रव्य मिळते. त्यामुळे कफ तयार करणार्‍या यंत्रणेवर नियंत्रण येते. फिश ऑईलमधून हे द्रव्य नित्य प्राशन करणार्‍या मुलांचा अस्थम्याचा त्रास कमी झाला असल्याचे प्रयोगांमधून आढळून आले आहे.

वजन नियंत्रण – वजनावर नियंत्रण ठेवल्यास अस्थम्याचा त्रास कमी होतो आणि जस जसे वजन वाढते तस तसा हा त्रास असह्य होत असतो. त्यामुळे अस्थमा असणार्‍या रुग्णांनी वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर अस्थम्याची तीव्रता वाढविणार्‍या काही गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. त्यात पहिली गोष्ट आहे धूम्रपान. पाळीव प्राणी, हवेतील प्रदूषण आणि धूळ यांमुळे सुद्धा अस्थमा बळावू शकतो. म्हणून या पासूनही दूर राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment