सर्वात महागडे चीज बनते गाढविणीच्या दुधापासून

gadhav
आजकाल देशविदेशातील अनेक पाककृती जगात सर्वत्र रूळत चालल्या आहेत आणि त्या लोकप्रियही आहेत. विदेशी पाककृतीतून चीजचा वापर सढळ हस्ताने केला जातो आणि आता भारतीयांच्या जिभेवरही चीजची चव चांगलीच चढली आहे. प्रत्येक देशाची चीज बनविण्याची स्वतःची खास पद्धत असते आणि जगात हजारो प्रकारची चीज उपलब्धही आहेत. चीज हा तसा महागडा पदार्थ असला तरी यातही किंमत भेद आहेच. कोणत्या दुधापासून बनलेले चीज जास्त महाग आहे याचे उत्तर आहे गाढविणीच्या दुधापासून बनलेले चीज.

चीज गाय, म्हैस, शेळी, उंट, मेंढ्या अशा अनेक प्राण्यांच्या दुधापासून बनविले जाते. मात्र गाढविणीच्या दुधापासून बनविले गेलेले चीज सर्वात मौल्यवान समजले जाते. त्याची आजची बाजारातली किंमत आहे किलोला ८०० पौंड म्हणजे ६८८०० रूपये. गाढविणीच्या २५ लिटर दुधापासून १ किलो चीज बनते. सर्बिया मधील जेसाविका येथे हे महागडे चीज बनते.

असे सांगतात की इजिप्तची सौंदर्यखणी राणी किलओपात्रा हिच्या सौंदर्याचे गुपित होते ती स्नानासाठी वापरत असलेल्या दुधामध्ये. क्लिओपात्रा गाढविणीचे दूध स्नानासाठी वापरत असे असे म्हणतात. त्यामुळे गाढविणीच्या दुधाचे चीज लोकप्रिय आहे. यापूर्वी सर्वात महागडे चीज किलोला ६३० पौंड म्हणजे ४२८४० रूपयांना विकले जात होते. स्वीडनमध्ये बनणारे हे चीज खास मोठ्या शिंगाची हरणे मूज यांच्या दुधापासून बनविले जाते.

Leave a Comment