वजन घटवण्याचे साधे सोपे उपाय

weight-loss
सातत्याने कामाच्या निमित्ताने होणारा प्रवास, दररोज प्रवास करून कामाला जाणे, कामाचा दबाव, चरबीयुक्त पदार्थांसाठी अनारोग्यकारक खाणे, साखर, मिठाचे अधिक प्राशन, बैठे काम या सगळ्यांमुळे आरोग्याला आव्हान मिळते आणि त्यातूनच लठ्ठपणा वाढीस लागतो. परिणाम हायपर टेंशन, मधुमेह, हाडांची झीज. या सगळ्या गोेष्टी जर टाळल्या नाही तर जीणे आरोग्यकारक होणार नाही म्हणून जीवनशैली बदलली पाहिजे. मात्र जीवनशैली बदलणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे लागेल. ते ठेवले की बर्‍याच गोष्टी सोप्या जातील.

अधूनमधून नाष्टा करणे, भूक नसताना वडा-पाव, पाव-भाजी, बर्गर, पिझ्झा यांचे अती सेवन करणे यातून जाडी वाढते. मात्र मधेच भूक लागल्यामुळे हे पदार्थ खावे लागतात. त्यावर उपाय म्हणजे चांगली न्याहरी करून घराबाहेर पडणे आणि सोबत एक छोटे सफरचंद ठेवणे. भूक लागलीच आणि सफरचंदाने भागले नाहीच तर तळलेले पदार्थ खाऊ नका. मिल्क शेक आणि भरपूर साखर घातलेले फळांचे रस आवर्जून टाळा. आपल्याजवळ नेहमी बदाम, पिस्ता किंवा मनुका असूद्या. भुकेची जाणीव होताच चार दाणे तोंडात टाका.

मान फिरविण्याचा व्यायाम घ्या. गाडी चालवत असाल तर अधूनमधून गाडी थांबवून मधेच थोडेसे अंग मोकळे करून घ्या. त्याचा फार चांगला परिणाम होतो. दिवसभरात जमेल तेव्हा मैल दोन मैल चाला. चालण्याने मन ताजेतवाने होते. तणावापासून ते मुक्त होते आणि काही तरी खाण्याचा मोह त्यामुळे टळतो. सातत्याने तणावाखाली जगणारे लोक अधूनमधून खात सुटतात. त्याचा परिणाम वजनावर होतो.

भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर अधूनमधून हर्बल टी, नारळाचे पाणी हेही पिण्याची सवय ठेवा. वजन कमी करणे किंवा लठ्ठपणा कमी करणे हे फार कर्मकठीण काम आहे असे समजू नका. सातत्याने आणि नियमाने सोपे सोपे उपाय योजिले तरी वजन बर्‍यापैकी कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment