मनपसंत आकारातील फळे भाज्या आता शक्य

buddha
बाजारात आपण जातो तेव्हा तेथील ताज्या भाज्या, रसरशीत फळे पाहूनच डोळे निवतात. मात्र निसर्गाने या भाज्या फळांना दिलेले सगळे आकार आपल्या पसंतीस येतातच असे कुठे आहे? एखाद्याला आपल्या घरच्या बागेत आपल्या आवडत्या आकारात फळे यायला हवी असतील तर ते आता शक्य होणार आहे. म्हणजे हृदयाच्या आकारातील बटाटे, चौकोनी कलिंगड, आयताच्या आकाराची सफरचंदे, आणि अगदी बुद्धाच्या चेहर्‍याची नाश्पती आपल्या बागेतील झाडांवर येऊ शकणार आहे ती चिनी कंपनी फूड मोल्डच्या सहाय्याने.

या कंपनीने असे विविध मोल्ड तयार केले आहेत. आपल्या आवडत्या फळाचा अथवा भाजीचा जो आकार आपल्याला हवा असेल तेथे फळ धरू लागताच हे मोल्ड बसवायचे. फळ अथवा फळभाजी पूर्ण आकारात वाढली की त्या मोल्ड प्रमाणे तिचा आकार येतो. हे मोल्ड चीनमध्येच बनविले जातात आणि सर्व जगभर पाठविले जातात. त्यामुळे घरच्या परसबागेत आता चौकोनी कलिंगडे, आयताकृती सफरचंदे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

1 thought on “मनपसंत आकारातील फळे भाज्या आता शक्य”

Leave a Comment