पृथ्वीवर आहेत ११ कोटी ७० लाख सरोवरे

earth
न्यूयॉर्क – सुमारे नऊ वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सरोवरांची संख्या किती असावी यासाठी केलेल्या संशोधनांतील आकडे नव्याने केलेल्या संशोधनात चुकीचे ठरले आहेत.२००६ साली केलेल्या या संशोधनांत पृथ्वीवर ३० कोटी सरोवरे आहेत असा अहवाल सादर केला होता मात्र नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात पृथ्वीवर लहान मोठी मिळून ११ कोटी ७० लाख सरोवरे असल्याचे आढळले आहे.

जिऑलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये नवीन संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन संशोधनात हाय रेझोल्युशन डेटा व सुपर कॉम्प्युटरचा वापर केला गेल्याने ही निरीक्षणे अधिक अचूक आहेत असा संशोधकांचा दावा आहे. नवीन संशोधनानुसार या ११ कोटी ७० लाख सरोवरांपैकी ९ कोटी सरोवरे छोट्या आकाराची म्हणजे ०.५ एकर ते २०५ एकर इतक्या आकाराची आहेत.

स्वीडनच्या युमिया विद्यापीठातील पर्यावरण संशोधक डेव्हीड सीकेल यांच्या म्हणण्यानसार पृथ्वीवरील सरोवरे जेथे लोक राहात नाहीत अथवा मानवी वस्ती नाही त्या भागात अधिक संख्येने आहेत. दूर उत्तरेकडे ही संख्या जास्त आहे. पृथ्वीच्या एकूण आकारमानातील ५० लाख चौरस किलोमीटर क्षेत्र या सरोवरांनी व्यापलेले आहे.

Leave a Comment