गरोदरपणातील आहार

food
जन्माला येणारे मूल जन्माला येण्याच्या आधीच आईच्या पोटात वाढत असते आणि तिथे होणारी त्याची वाढ ही आपल्याला दिसत नसली तरी ती मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे मुलाची काळजी घेण्याविषयी त्याच्या जन्माच्या पूर्वीच नियोजन करावे लागते. मूल पुढच्या आयुष्यामध्ये निरोगी, सक्षम, कार्यक्षम रहावे यासाठी त्याच्या आईला गरोदर अवस्थेत चांगला आहार दिला पाहिजे. याच काळात या मातांना फळे आणि पोषण द्रव्य युक्त अन्न दिले पाहिजे.

फळे आणि भाज्या – गरोदर महिलेने फळांचे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे कारण त्यातून अनेक प्रकारची पोषण द्रव्ये मिळत असतात. विशेषत: हिरव्या पालेभाज्या आणि त्या त्या हंगामात उपलब्ध होणारी फळे यांचा गरोदर महिलांच्या आहारात समावेश केला पाहिजे. सामन नावाचा मासा गरोदर महिलेला खायला दिल्यास त्याच्या माध्यमातून ओमेगा-३ हे फॅटी ऍसिड तिला मिळते. त्याचा उपयोग बाळाचा मेंदू आणि डोळे चांगली होण्यासाठी होतो.

प्रथिनांसाठी अंडी आणि दूग्धजन्य पदार्थ दिले पाहिजेत. योगुर्टचा वापर सुद्धा अलीकडे होत आहे. योगुर्ट हे कॅल्शियम आणि प्रथिनांनी युक्त असते. या व्यतिरिक्त गरोदर महिलेच्या आहारात दाळी आणि उसळींचा समावेश केला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment