इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव

interview
एखाद्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना खूप काही तयारी करावी लागते, असे वारंवार सांगितले जात असते. परंतु या तयारीचे काही आगळेवेगळे घटक मोठ्या प्रमाणावर उपेक्षित राहिलेले असतात. त्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुलाखत देणार्‍याचा आत्मविश्‍वास. तो विविध प्रकारे आणि विविध निमित्तांनी व्यक्त होत असतो. साधारणत: असे मानले जाते की, इंटरव्ह्यू हा उमेदवारांसाठी असतो. जी कंपनी नोकरी देणार आहे ती कंपनी ज्याला नोकरी द्यायची असेल त्याची परीक्षा घेत असते. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि यासाठीच इंटरव्ह्यू असतो. परंतु उलट्या बाजूने सुद्धा हा प्रकार होऊ शकतो.

एखादा उमेदवार इंटरव्ह्यूला आलेला असतो तेव्हा तो सुद्धा कंपनीला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कंपनी नेमकी काय आहे, हे जाणून घेणे त्याचे कर्तव्यही असते आणि तो त्याचा हक्कही असतो. तेव्हा इंटरव्ह्यूला जाणार्‍या उमेदवाराने इंटरव्ह्यूच्या दरम्यान एका वेगळ्या प्रकारे कंपनीविषयी काही प्रश्‍न इंटरव्ह्यू घेणार्‍या पॅनलला विचारावेत. यातून त्याचा आत्मविश्‍वास प्रकट होत असतो. म्हणजे तो एक गरजू माणूस म्हणून तिथे आलेला नसून कंपनीच्या विकासात भर घालणारा एक घटक म्हणून काम मिळविण्याच्या उद्देशाने आलेला आहे हे तो दाखवू शकतो. मात्र असे करताना तो कंपनीविषयी जे प्रश्‍न विचारेल ते प्रश्‍न ङ्गारच विचारपूर्वक तयार केलेले असावेत. त्यामध्ये परिपक्वता दिसली पाहिजे. कंपनीचे नाव, उत्पादन, सेवा, आपण इंटरव्ह्यू देत असलेल्या पदाचे स्वरूप या सगळ्या प्राथमिक गोष्टी तर त्याला माहीत असाव्यात. त्या विचारता कामा नयेत.

आपल्या कामाचे स्वरूप काय असेल आणि आपल्यावर कोणत्या जबाबदार्‍या टाकल्या जातील याविषयी एखादा प्रश्‍न विचारायला हरकत नाही. मात्र कंपनीची आगामी वाटचाल, विस्ताराच्या योजना आणि कंपनीतील अधिकार श्रेणीची रचना याविषयी जरूर प्रश्‍न विचारावेत. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नेमके कुठे बसतो हे समजून घेण्यासाठी काही प्रश्‍न विचारल्यास त्या उमेदवाराचे कौतुकच होते. मात्र त्या प्रश्‍नातून आपल्याला कंपनीमध्ये, कंपनीच्या विस्तारामध्ये रस आहे हे दिसले पाहिजे. आपल्याला अधिकाधिक चांगले काम करता यावे यासाठी आपण प्रश्‍न विचारत आहोत असे स्पष्ट व्हावे. त्यातून उमेदवाराचा आत्मविश्‍वास तर प्रकट होतोच, परंतु कंपनीला या उमेदवाराला आपल्या प्रगतीत रस आहे हे लक्षात येते आणि अशा उमेदवाराची निवड सोपी जाते. हा प्रकार थोडा वधुपरीक्षेसारखा आहे. वधुपरीक्षेत वरानेच वधुला प्रश्‍न विचारावेत, असे साधारणत: मानले जाते आणि वर तिला काहीही विचारतो. त्याची ङ्गार चर्चा होत नाही. मात्र काही ठिकाणी मुलीलाच मुलाला काही प्रश्‍न विचारण्याची मुभा दिली जाते. त्यावेळी मुलगी मुलाला काय विचारते याची खूप चर्चा होत असते.

Loading RSS Feed

Leave a Comment