बदललेल्या नावासह अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’ येणार आहे. अक्षयसोबत या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. कियाराचा लूक या पोस्टरद्वारे समोर आला आहे.


‘लक्ष्मी’ चित्रपटाचे पोस्टर नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘आता प्रत्येक घरात येणार लक्ष्मी. ९ नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसोबत तयार रहा’ असे म्हटले आहे. अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कियाराचा लूक पाहाण्यासारखा आहे. तिच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव काही दिवसांपूर्वीच बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे.

‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. एका ट्रान्सजेंडर भूताने या चित्रपटात अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले आहे. तसेच तब्बल १२५ कोटी रुपयांना ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.