मोदींनी सी-प्लेन द्वारे 40 मिनिटात पार केले 200 किमीचे अंतर


अहमदाबाद – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस असून नर्मदा जिल्ह्याच्या केवडियामध्ये मोदींनी देशातील पहिली सी-प्लेन सेवेचा शुभारंभ केला. त्याचबरोबर मोदींनी स्वतः सी-प्लेनने प्रवास केला. सी-प्लेनने दुपारी जवळपास 1 वाजता मोदींना घेऊन केवडियामधून उड्डाण केले आणि जवळपास 1.40 वाजता साबरमती रिव्हर फ्रंटवर पोहोचले. देशात सी-प्लेनची सुविधा देणे मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता.

नर्मदा जिल्ह्याच्या केवडिया ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत ही सेवा सुरू झाली आहे. 1500 रुपये एवढे याचे भाडे ठेवण्यात आले आहे. 200 किमीचे अंतर सी-प्लेनने केवळ 40 मिनिटात पूर्ण होईल. रस्ते मार्गे एवढे अंतर पार करण्यासाठी जवळपास 4 तास लागतात. सी-प्लेन पाणी आणि जमिनीवर लँड करु शकते. यासाठी रनवेचीही गरज नसते.

अशी आहेत सी-प्लेनची वैशिष्टेय – याचे वजन 3377 किलो असून इंधन क्षमता 1419 लीटर एवढी आहे. तर याची लांबी 16 मीटर व उंची 6 मीटर आहे. फ्यूल पावर बाबत सांगायचे झाले तर 272 लीटर/तास, तर 5670 किलो पर्यंत वजन पेलू शकते.