रिलायन्स जिओ सुसाट , युजर संख्या ४० कोटी पार

रिलायन्स जिओचा सुरवातीपासूनचा प्रवास अतिशय वेगवान राहिला असून अजूनही तो कायम राहिला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जिओने ७३ लाख नवे ग्राहक जोडले असून युजर्सची एकूण संख्या ४० कोटी ५६ लाखांवर पोहोचली आहे. याच काळात जिओने कमाईचाही विक्रम केला आहे. शुक्रवारी रिलायन्स उद्योगाच्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली गेली. त्यानुसार जिओने प्रत्येक युजर मागे महिना १४५ रुपये कमाई केली आहे.

या तिमाहीतील जिओची कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२ टक्के अधिक आहे. प्रती युजर या काळात १२ जीबी डेटा वापरला गेला आहे आणि १३ तासाचा टॉक टाईम वापरला गेला आहे. या तिमाहीत जिओने ३०२० कोटींची एकूण कमाई केली असून ती गतवर्षी पेक्षा २०५ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी जिओने याच काळात ३३० कोटींचा नफा मिळविला होता. कंपनीची एकूण उलाढाल २१,७०८ कोटी आहे.

काही दिवसापूर्वी जिओने मोबाईल युजरसाठी मेड इन इंडिया वेब ब्राऊझर लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यात युजरच्या डेटा प्रायव्हसी आणि युजर कम्फर्टची काळजी घेतली गेली आहे. आगामी काळात जिओ ५ हजार पेक्षा किंमी किमतीचे ५ जी स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहे.