या गावात माशी निवडते सरपंच

houseflu
पुणे- पुण्याच्या खेड तहसील मधील सातकरवाडी गावात सरपंच आणि उपसरपंचाची निवड करण्याच्या अधिकार माशीला असून या निवड पद्धतीबाबत येथील जिल्हा अधिकारी कार्यालय अंधारातच आहे असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार या गावात भैरवनाथाचे मंदिर असून ती ग्रामदेवता आहे. या देवावर गावकर्‍यांची मनोमन श्रद्धा आहे. गावकरी खंडेराव ठिगळे यांनी या मंदिरातच सरपंच उपसरपंचाची निवड करण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी मांडली. या पदासाठी जे उमेदवार आहेत, त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या केल्या जातात आणि देवासमोर ठेवल्या जातात. ज्या चिठ्ठीवर माशी बसेल ती चिठ्ठी काढून त्यात ज्याचे नांव असेल त्याची निवड केली जाते. वास्तविक सरपंच उपसरपंचाची निवड लोकशाही मार्गाने होणे गरजेचे असताना व माशीकडून निवड करून घेणे बेकायदेशीर असतानाही येथे हीच प्रथा पाळली जाते.

यामागचे कारण सांगताना ठिगळे म्हणाले की निवडणूक म्हटले की खर्च आला. शिवाय गावात दोन गट पडतात, तणाव निर्माण होतो त्यापेक्षा गावात शांतता रहावी यासाठी आमचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथाच्या साक्षीने आम्ही सरपंच निवडणे अधिक पसंत करतो.

Leave a Comment