पक्ष्याच्या घरट्यांनी कोलमडतात झाडे

weaver
झाडांवर पक्ष्यांनी घरटी बांधणे हा निसर्गनियमच म्हणायला हवा. महाप्रचंड वृक्षांपासून अगदी काटेरी झुडपांपर्यंत सर्व तर्हेिची झाडे पक्षांना आश्रय देत असतात. मात्र या पक्ष्यांच्या घरट्यांमुळे आश्रय देणारे महाप्रचंड वृक्ष कित्येकदा कोसळतात असे सांगितले तर त्यावर कुणाचाही चटकन विश्वास बसणार नाही.

आफ्रिकेतील सोशल विव्हर किंवा आपल्या भाषेत सुगरण पक्ष्यांसाठी असे वृक्ष पाडणे हा हातचा मळ आहे. चिमणीच्या आकाराचा हा पक्षी ज्या वृक्षावर घरे बांधतात तेथे अक्षरशः कॉलनीच उभी करतात. घरटी बांधताना एकत्र येऊन हे पक्षी ५०० पेक्षा अधिक घरटी बांधून कॉलनीच तयार करतात. या घरटयांचे एकूण वजन ९०० किलो पर्यंत भरते शिवाय घरट्यातील पक्षांचे वजन वेगळेच. यामुळे अनेकवेळा वृक्ष कोसळतात. मात्र ही घरटी इतकी भक्कम असतात की शंभर वर्षही त्यांना कांहीही होत नाही.

गेविन लिंगटन हे बायोलॉजिस्ट सांगतात, ही राक्षसी घरटी बांधताना हे पक्षी घरट्यात गवत, पिसे, कापूस घालून आतून ती उबदार आणि मउ बनवितात. अशा एका घरट्यात ३-४ पक्षी राहतात. तळाशी एक प्रवेशद्वार असते त्यामुळे पाणी आत येत नाही तसेच पिलांची शिकार करणे अन्य प्राण्यांना शक्य होत नाही. अशी एकाच वेळी ५०० घरटी एकाच झाडावर एकापुढे एक बांधली जातात मात्र ती आतून जोडलेली नसतात तर प्रत्येक घरट्याला स्वतंत्र दार असते. असे एकत्र राहण्यामागेही शत्रूपासून संरक्षण मिळविणे हाच हेतू असतो.

Leave a Comment