तुमच्या झोपेतील हालचाली सांगणारे स्लीपबूट

sleepboot
स्मार्टफोनच वापर जसा वाढत चालला आहे तसे स्मार्टफोन मेकर पासून ते अॅप मेकर्सपर्यंत सर्वजणच युजरच्या तब्येतीची काळजी घेण्यास तप्तर झाले आहेत. तब्येतीची काळजी घेणारी तसेच फिटनेस राखण्यास मदत करणारी शेकडो अॅप आणि डिव्हायसेस बाजारात आली आहेत. मात्र ही सारी उपकरणे तुम्ही स्मार्टफोन प्रत्यक्ष वापरत असता तेव्हाच उपयुक्त आहेत. झोपेत असताना युजरच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवीच ना? मग त्यासाठी आता स्लीपबूट नावाचे अॅपही बाजारात आले आहे.

माणसाच्या जीवनातील एक तृतीयांश काळ हा झोपेत जात असतो असे शास्त्र सांगते. आपण झोपेत काय काय करतो हे झोपी गेलेल्याला समजणे कठीणच. मात्र आता तेही या अॅपमुळे माहिती पडणार आहे.या अॅपला स्मार्ट अॅलार्म फिचर दिला गेला आहे. जो तुम्हाला पॉवर नॅपनंतर झोपेतून जागे करतो. तसेच तुम्ही घोरलात का?, झोपेत चाललात काय, झोपेत बडबड केली काय याचे ग्राफ तयार करतो. या अॅपचे सेटींग युजर आपल्या हिशोबाने अॅडजस्ट करू शकतो. झोपेतून जागे झाल्यानंतर आपण झोपेच्या काळात काय काय केले याची कल्पना युजरला या ग्राफच्या सहय्याने येते. गुगल प्लेवर हे अॅप उपलब्ध असून आत्तापर्यंत ते १० लाख युजरनी डाऊनलोड केले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment