चिपांझीने केला स्वतः ड्रेस डिझाईन

gariba
लंडन- चिपांझी माकडे बुद्धीवान असतात आणि त्यांची बरीचशी वर्तणूक माणसासारखीच असते. माणसाचा पूर्वज चिपांझीच असावेत असाही एक प्रवाद आहे. माणसांना तर्‍हतर्हेचचे कपडे घालून मिरविणे जसे आवडते तोच गुण चिपांझीतही असावा असे वाटणारी घटना लंडनच्या प्राणीसंग्रहालात नुकतीच घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्राणीसंग्रहालयातील सहा चिपांझीना कॉफीच्या बियांची मोकळी झालेली पोती देण्यात आली आणि ते या पोत्यांचा वापर कसा करतात याचे निरीक्षण करण्यात आले. त्यातील १६ वर्षीय गंबीरा नावाच्या माकडीणीने चमत्कार करून दाखविला. तिने या पोत्याचे दोन्ही कोपरे फाडून त्यातून प्रथम हात बाहेर काढले. नंतर वरची बाजू फाडून डोके घातले. तिचा हा सारा उद्योग प्राणीसंग्रहालयात आलेले प्रेक्षक पाहात होतेच त्यांनी त्वरीत फोटो काढायला सुरवात केली तेव्हा तिने त्यांना फोटोसाठी मस्त पोजही दिल्या.

या प्रयोगावर देखरेख करणारे नील बेमेंट म्हणाले की चिपांझींना अशी पोती दिली मात्र त्यातील गंबीराने त्याचा असा उपयोग केला. यावरून तिची जिज्ञासा आणि बुद्धीमत्ता कळून आली. गंबीरा बोर्नियन प्रजातीची चिपांझी असून ही जात आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगभरात या जातीचे केवळ ५० हजार चिपांझी शिल्लक राहिले आहेत. जंगलतोड, पाम प्लांटेशन आणि शिकार यामुळे ही जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Leave a Comment