हम्प्टी खरंच भिंतीवरून पडला

humpti
इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या जगभरातील विद्यार्थ्यांना पाठ असलेल्या अनेक सुंदर कवितांतील हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन व वॉल, हम्प्टी डंप्टी हॅड ए ग्रेट फॉल ही कविता नक्कीच पाठ असते. कल्पनेतील ही कविता प्रत्यक्षात येण्याचा विक्रम अमेरिकेत घडला आहे.

घडले असे की ओरेगॉन प्रांतात अशा प्रसिद्ध कविता आणि दंतकथांवर आधारित एक थीम पार्क उभारले गेले आहे. ४० वर्षांपूर्वी उभारलेल्या या पार्कमध्ये हंप्टी डंप्टींचे पुतळे एका भिंतीवर बसविले गेले आहेत. कांही उत्साही पर्यटकांनी या भिंतीवर चढून त्यांचे फोटो काढण्याचे प्रयत्न केले मात्र वाळूपासून बनविलेली ही भिंत कोसळली आणि हम्प्टीचा पुतळाही त्याबरोबरच चक्काचूर झाला. आता हा पुतळा नव्याने करण्यासाठी किमान महिनाभर लागणार असल्याचे डम्पटीला एकट्यानेच हा काळ व्यतीत करावा लागणार आहे.

Leave a Comment