स्थूलपणाचे असेही फायदे

fat
वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या संशोधकाने त्याच्या सहकार्‍यासमवेत केलेल्या संशोधनात स्थूल असलेल्या व्यक्तींना हृदयरोगामुळे येणर्‍या मृत्यूपासून अधिक संरक्षण मिळते असे दिसून आले आहे. वास्तविक जाडपणा किवा स्थूलपणा हा हृदयवाहिन्यांच्या विकारांना अधिक कारणीभूत होतो असे आजपर्यंत मानले जात होते मात्र नवीन संशोधनात या स्थूलपणामुळेच अशा व्यक्ती हृदयविकारामुळे मरण येण्यापासून वाचतात असे आढळले आहे.

स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क डाऊनस्टेट मेडिकल सेंटरमधील अभिषेक शर्मा आणि त्यांच्या सहकार्‍यानी हे नवीन संशोधन केले. त्यात त्यांनी बॉडी इंडेक्स जास्त असलेल्या, नॉर्मल असलेल्या आणि अतिजास्त असलेल्या रूग्णांची निरीक्षणे नोंदविली. तेव्हा असे आढळले की ज्यांचा बॉडीइंडेक्स (बीएमआय) २५ ते ३० प्रती वर्ग मीटर आहे, त्यांच्यात नॉर्मल बॉडी इंडेक्स म्हणजे २० ते २५ प्रती वर्ग मीटर असलेल्या व्यक्तींपेक्षा हृदयविकाराने येणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तर बॉडी इंडेक्स खूप जास्त म्हणजे ३० ते ३५ प्रती वर्ग मीटर असलेल्या व्यक्तींत हे प्रमाण नॉर्मल इंडेक्स असलेल्यांपेक्षा थोडेसेच अधिक आहे. यावरून स्थूलपणामुळेच हृदयविकार होण्याचा जास्त धोका असल्याच्या कल्पनेला छेद मिळाला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment