सर्वाधिक मोती जडविलेला वेडिंग गाऊन- वजन १८१ किलो

gaun
अमेरिकेच्या एडिना येथील डिझायनर गेल बी हिने जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक मोती जडविलेला वेडिंग गाऊन तयार केला असून त्याची नोंद गिनिज बुकात घेतली जाणार आहे.

गेल हिला हा गाऊन बनविण्यासाठी तब्बल तीन वर्षे सतत मेहनत करावी लागली आहे. या कामी तिने आणखी २२ डिझायनरचीही मदत घेतली होती. २० फूट लांबीच्या या वेङिंग गाऊनवर ९ लाख ९५ हजार मोदी जडविले गेले आहेत. यामुळे गाऊनचे वजन १८१ किलो इतके प्रचंड झाले आहे. गिनीज बुक रेकॉर्ड नुसार यापूर्वी ४५ हजार मोदी जडविलेला वेडिंग गाऊन तुर्कस्तानातील डिझायनरने २०११ साली तयार केला होता.

गेल सांगते, असा गाऊन बनविणे माझे स्वप्न होते, ते पुरे झाले आहे. मात्र गाऊनचे वजन खूपच असल्याने कोणती वधू तो परिधान करेल असा प्रश्न आहे. कारण वधूला हा १८१ किलोचा गाऊन अंगावर घालून विवाहवेदीपर्यंत जाणे अशक्यच होणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे कुणी तो घालो वा न घालो, हा गाऊन आपण संग्रहालयात ठेवायचा असा निर्णय मी घेतला आहे.

Leave a Comment