याहू मोबाईलचा पहिला स्मार्टफोन आला

फोटो साभार एचटी टेक

याहू मोबाईलने झेडटीई ब्लेड ए ३वाय हा पाहिला स्मार्टफोन युएस बाजारात लाँच केला आहे. गेले काही दिवस याहू नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याची चर्चा सुरु होती. कंपनीने या फोनच्या निमित्ताने सेल्फ ब्रांडेड स्मार्टफोन क्षेत्रात प्रवेश केला आहे.

हा फोन झेडटीई ने तयार केला आहे पण याहू ब्रांड खाली तो विकला जाणार आहे. याहू ब्रँडचा हा पहिला फोन ५० डॉलर्स म्हणजे ३७०० रुपयात ग्राहकाला मिळणार आहे. त्यात अनलिमीटेड टॉक टाईम सह ४जी एलटीई डेटा सुविधा दिली गेली आहे. ग्रेप जेली कलर मध्ये हा फोन सादर केला गेला आहे. या फोनसाठी ५.४५ इंची एचडी फुलव्हिजन डिस्प्ले, २ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत नेण्याची सुविधा दिली गेली आहे. ८ एमपीचा ड्युअल एलईडी फ्लॅश सह रिअर कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडीओ कॉलिंग साठी ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. फिंगरप्रिंट सेन्सर बॅक पॅनलवर दिला गेला आहे.