मरणासन्न झाडांना लसणामुळे मिळेल संजीवनी

lasun
माणसांप्रमाणेच झाडांनाही जन्ममरण आहे. माणसांप्रमाणेच कांही वेळा रोग झाल्याने झाडेही अकाली मरतात. कांही झाडे ऐतिहासिक महत्त्वाची, भावनिकदृष्ट्या महत्वाची असतील तर हे अकाली मरणे त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी रोगग्रस्त झाडांना लसणाचे इंजेक्शन देऊन त्यांना पुन्हा संजीवनी देण्याचे प्रयोग ब्रिटनमध्ये सूरू आहेत. बड्या फार्मवर ब्रिटन सरकारच्या सहाय्यानेही हे प्रयोग केले जात आहेत.

लसणाची इंजेक्शन देऊन झाडे वाचविण्याचा प्रयोग अव्यवहार्य आणि महागडा आहे. मात्र कांही महत्त्वाच्या झाडांसाठी तो करता येईल असे संशोधकांचे म्हणणे आहे. लसणात अँटी बॅक्टीरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत.लसणातील एलिसन हे द्रव्य हे काम प्रामुख्याने करते. हे द्रव्य झाडात घालण्यासाठी खास यंत्र तयार करण्यात आले आहे. आक्टोपस ट्यूब नावाच्या या यंत्राला ८ ट्यूब जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे हे द्रव्य झाडाच्या सर्व बाजूंनी झाडात सोडता येते. हे द्रव्य झाडात जाताच तेथील रोगजंतूंचा पूर्ण नायनाट करते. या द्रव्यात कार्बन पदार्थ आहेत मात्र त्यामुळे झाडाला त्यापासून नुकसान न होता उलट फायदाच होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment