चॉकलेटसाठी फेमस शहरे

choco
चॉकलेट हा आबालवृद्धांचा आवडता पदार्थ. जगभरात चॉकलेट प्रेमींची संख्या नक्की किती असेल याचा अंदाजही करणे अवघड. ११०० इसवी सनापूर्वी काकावच्या बियांपासून प्रथम चॉकलेट बनविणारयाच्या कल्पनेचा गौरव करावा तितका कमीच म्हणावा लागेल. असे हे चॉकलेट आज जगाच्या कानाकोपर्‍यात सर्वत्र उपलब्ध असले तरी चॉकलेट हीच खासियत असलेली कांही प्रसिद्ध शहरे आहेत. त्यातील पाच शहरे कोणती असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर खाली मिळेल.

स्वित्झर्लंडमधील झुरीच हे अत्यंत लोकप्रिय असलेल्या टोबलेरोन, नेस्ले, लिंडर या कंपन्यांचे माहेरघर आहे. चॉकलेटचा मोठा व्यापार या शहरात होतो तसेच येथे चॉकलेट ब्युटिकही आहेत. बेल्जियममधील ब्रुसेल्स हा तर चॉकलेटसाठीचा धरतीवरील स्वर्गच मानला जातो. या शहरात दोन हजारांहून अधिक चॉकलेटची दुकाने आहेत. चॉकलेटची १६ संग्रहालये आणि १२ कारखाने ही या शहराची अन्य कांही वैशिष्ठ्ये. ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियमचे हृदयच मानले जाते. येथे जगातील सर्वात मोठा चॉकलेटचा बाजार आहे. आणि ही जगाची चॉकलेट राजधानी मानली जाते.गोदिवा, लियोनीदास या जगप्रसिद्ध कंपन्या येथल्याच आहेत.

सॅन फ्रान्सिस्को हे अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील शहरही चॉकलेटची राजधानी मानले जाते. गोल्ड रशच्या काळात स्थापन झालेली जगप्रसिद्ध धिराडेली चॉकलेट कंपनी येथेच आहे. तर मॅक्सिकोतील ओक्साका हे चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेले पाचवे शहर आहे. मेक्सिकोपासून निकाराग्वा कोस्टापर्यंत पसरलेल्या या परिसराला मेसो अमेरिकन्सचा भाग म्हणून ओळखले जाते आणि हे लोक चॉकलेट सर्वाधिक पसंत असणारे लोक आहेत. येथे चॉकलेटचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होते. ओक्साका येथे चॉकलेट स्ट्रीट आहे आणि तेथे हरतर्हे ची चॉकलेट खवय्यांचा आत्मा तृप्त करायला सज्ज आहेत.

Leave a Comment