चमचमीत नूडल्स भजी

noodles
साहित्य- हरबरा डाळीचे पीठ(बेसन) १ वाटी, कॉर्नफ्लोअर २ चमचे, उकडून घेतलेल्या नूडल्स १ वाटी, बारीक उभा चिरलेला कोबी अर्धी वाटी, आवडत असल्यास १ कांदा बारीक उभा चिरलेला,२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, १ छोटा चमचा लाल तिखट, तळण्यासाठी तेल

कृती – प्रथम एका पातलेल्या नूडल्स बुडतील इतके पाणी उकळायला ठेवा. उकळी आल्यावर त्यात १ चमचा तेल व नूडल्स घाला. नूडल्स मऊ झाल्या की पाणी ओतून नूडल्स निथळा व त्यावर लगेचच गार पाणी ओतून धुवून घ्या. आता बेसनात कार्नफ्लॉवर मीठ, लाल तिखट,हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक लांब तुकडे केलेले आले, कांदा, कोबी आणि नूडल्स घालून एकत्र कालवा. आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याच्या पीठाइतपत सैल भिजवा. थोडे गरम तेल घालून पुन्हा एकत्र कालवा आणि गरम तेलात कुरकुरीत, सोनेरी रंगाची भजी तळून काढा. गरमागरम सर्व्ह करा.

ही भजी नुसती खा किंवा हिरवी चटणी, टोमॅटो सॉस बरोबर खा. छान लागतात.

Leave a Comment