क्रिस गेलने ठोकला १००० वा षटकार

फोटो साभार ट्विटर

युएई मध्ये सुरु असलेल्या आयपीएल २०२० मध्ये १ हजारावा सिक्सर ठोकून क्रिस गेलने विक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या विक्रमाच्या आसपास सध्या कुणीही खेळाडू नाही. क्रिस्तोफर हेन्री गेलने किंग्ज इलेवन पंजाब कडून फलंदाजी करताना शुक्रवारी राजस्तान रॉयल्सविरुद्ध हा विक्रम केला. युनिव्हर्स बॉस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रिसने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेट मध्ये १००० षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

अबू धाबीच्या शेख जायद मैदानात सुरवातीपासूनच क्रिस आक्रमक होता. राजस्तान रॉयलच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने केवळ ६३ चेंडूत ९९ धावा केल्या मात्र त्याचे शतक जोफ्रा आर्चरने पूर्ण होऊ दिले नाही. शेवटच्या ओव्हर मध्ये क्रिस आउट झाला. त्याने या खेळीत ६ चौकार आणि आठ षटकार लगावले. क्रिस नंतर याच्याच देशाचा कायरन वोलार्द याने ६९० षटकार लगावले असून तो या यादीत दोन नंबरवर आहे.

४१ वर्षीय क्रिस आयपीएल २०२० मध्ये पाहिले सात सामने बाहेरच होता पण एकदा मैदानात उतरल्यावर त्याने त्याच्या संघाला सलग ५ विजय मिळवून दिले. अर्थात क्रिसची ही खेळी संघाला विजयी करण्यात अपयशी ठरली कारण पंजाब इलेव्हनच्या ४ विकेट १८५ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सने अवघ्या १७.३ ओव्हर मध्ये तीन विकेट घालवून मोडून काढले. अर्थात हे दोन्ही संघ आता १२-१२ या समान गुणावर आहेत. त्यामुळे प्ले ऑफ मध्ये पंजाब संघ खेळू शकणार आहे.

क्रीसच्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये त्याने १०३ टेस्ट मध्ये ७२१४ धावा, ३०१ वनडे मध्ये १०४८० धावा तर ५८ टी २० मध्ये १६२७ धावा काढल्या आहेत.

Loading RSS Feed