व्हिडीओ; ‘तारक मेहता..’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी


सब टिव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशनसिंह सोढीच्या मुलाची अर्थात गोगीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समय शाहला जीवे मारण्याची काही गुंडांनी धमकी दिली. त्याला याआधीही दोन वेळा काही गुंडांनी घराजवळ येऊन धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला. बोरीवली पोलीस ठाण्यातयाप्रकरणी त्याने तक्रार दाखल केली असून यासंदर्भातील एक सीसीटीव्ह फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कधी एक गुंड तर कधी गुंडांचा ग्रुप मिळून समयला त्याच्या घराजवळ त्याला शिवीगाळ करायचे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचे. समय काही दिवसांपूर्वी शूटिंगहून घरी परतत असताना त्याला या गुंडांनी रोखले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समयने पोलिसांना फोन केल्यानंतर ते तेथून पळाले. जाताना ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी त्यांनी समयला दिली. धमकी देणारे लोक कोण आहेत आणि ते असे का करत आहेत, याची काहीच माहिती नसल्याचे समयने स्पष्ट केले. त्याने पोलिसांना इमारतीचे काही सीसीटीव्ही फुटेज सोपवले आहेत.