उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया


मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी चर्चा सध्या रंगली असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषेदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

पक्षाकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यासंबंधी संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितले यासंदर्भात मी देखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि यासंदर्भातील अधिकार मंत्रिमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहेत.

यावेळी बिहारमधील मुंगेर हिंसाचारावर संजय राऊत यांनी भाष्य केले. हा हिंदुत्वावर हल्ला असल्याचे ते म्हणाले आहेत. पण आतापर्यंत ना राज्यपालांनी, ना तेथील भाजपने यासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असे विचारा? असे सांगणार असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Loading RSS Feed