फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी पंतप्रधानांचे वक्तव्य


क्वालालंपूर – संपूर्ण जगात फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त होत आहे त्याचबरोबर फ्रान्सच्या दुःखात संपूर्ण जग सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत या हल्ल्याचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी समर्थन केले आहे.

गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर महातिर यांनी एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. त्यांनी यात फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. महातिर यांनी ‘इतरांचा सन्मान करा’ या नावाने लिहिण्यात आलेल्या या ब्लॉगमध्ये नीस हल्ल्याचा थेट उल्लेख केलेला नाही. एका पाठोपाठ एक, असे एकूण 14 ट्विट महातिर यांनी ट्विटरवर केले आहेत. यात त्यांनी मुसलमानांसोबत भेदभाव होत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर पूर्वी मुसलमानांवर जे अत्याचार फ्रान्सने केले, त्यासाठी फ्रान्सच्या लाखो नागरिकांची कत्तल करण्याचा मुसलमानांना पूर्ण अधिकार असल्याचे मोहम्मद यांनी म्हटले आहे.

चेचन्याई विद्यार्थ्याने फ्रेंच शिक्षक सॅमुअल पेटच्या हत्येचा उल्लेख करत मोहम्मद यांनी लिहिले, मुस्लिमांना रागावण्याचा अधिकार आहे. फ्रन्सच्या लाखो नागरिकांना पूर्वी केल्या गेलेल्या नरसंहारासाठी मारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण मुस्लीम ‘डोळ्याच्या बदल्यात डोळ्या’कडे अद्याप वळलेले नाहीत. आपल्या नागरिकांना फ्रान्सने दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची शिकवण द्यायला हवी.