मुलाच्या वक्तव्यावर कुमार सानू यांनी मागितली माफी


कलर्स टीव्हीवरील सर्वात चर्चित रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरात बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा लहान मुलगा जान कुमार सानू स्पर्धक म्हणून आहे. एका एपिसोडदरम्यान निक्की तांबोळी आण राहुल वैद्यला जान कुमार सानूने मराठी बोलण्यास मनाई केली होती. निक्कीला जान म्हणाला होता की, मराठीत बोलू नको मला चिड येते. मराठी भाषिकांना ही बाब आवडली नाही. यावर माफी मागण्याची मागणी शिवेसना आणि मनसेने केल्यानंतर जानने जाहिर माफीही मागितली होती. त्यानंतर त्याचे वडील गायक कुमार सानू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

बॉम्बे टाइम्ससोबत बोलताना कुमार सानू म्हणाले की, बिग बॉसच्या घरात जाण्यात जान कुमार सानूचा काहीही हात नव्हता. मला याबाबत जानने जेव्हा सांगितले तेव्हा मी त्याला नकार दिला होता. कारण मला वाटत होते की, हा एक वादग्रस्त शो आहे. तुम्हाला या शोमधून प्रसिद्धी मिळते, पण तुमची बदनामीही तेवढीच होते. तुमच्या सपोर्टमध्ये काही लोक आहेत तर विरोधात काही आहेत. जानने नंतर मला फोन करून सांगितले की, हा त्याचा अंतिम निर्णय असल्यामुळे त्याला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मी मदत केली हे विधान चुकीचे आहे.

कुमार सानू पुढे म्हणाले की, मी ऐकले की, शोमध्ये फार चुकीचे विधान माझ्या मुलाने केले. ४० वर्षात असा मी कधीही विचार केला नाही. मी कधीही महाराष्ट्राबाबत असा विचार करू शकत नाही. सर्वच भाषांचा मी आदर करतो आणि प्रत्येक भाषेत मी गाणी गायली आहेत. माझ्या मुलापासून मी गेल्या २७ वर्षांपासून वेगळा आहे. मला नाही माहीत त्याच्या आईने त्याला काय शिकवले. एक पिता या नात्याने मी केवळ माझ्या मुलासाठी तुम्हाला सर्वांची माफी मागू शकतो.

मी नेहमीच माझ्या परिवाराच्या संपर्कात राहिलो आहे. पण माझी पहिली पत्नी आणि मुलगा हे स्वत:च त्यांचे निर्णय घेत, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, हो, मी माझ्या तिन्ही मुलांसोबत डीनर केले आहे. मी कधी कधी जानला शॉपिंगलाही घेऊन जातो. बालपणापासून तो संगीताचे धडे गिरवत आहे. मी त्याच्या संपर्कात आहे पण त्याचे सर्व निर्णय हे त्याचे आहेत आणि त्याच्या आईचे आहेत.

कुमार सानू जान कुमार सानूच्या नुकत्याच झालेल्या वादावर म्हणाले की, नकळत मराठी भाषेबाबत जानने जे बोलले ते पूर्णपणे चुकीचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बंगाली जर माझी देवकी आई आहे जिने मला जन्म दिला तर मुंबई माझी यशोदा आई आहे. जिने मला काम दिले, अन्न दिले आणि मान-सन्मान दिला. आई मुंबा देवीवर माझी श्रद्धा आहे. कोणत्याही कलाकाराने मुंबईबाबत वाईट बोलू नये. मुंबईने अनेकांना जीवन दिले आहे.

त्याचबरोबर योगायोगाची बाब ही आहे की, माझी मुलगी शेनॉन ही एक मराठी ब्राम्हण परिवारातील आहे. तिला अनाथालयातून मी दत्तक घेतले होते. ती त्यावेळी केवळ १ महिन्याची होती. अमेरिकेत ती आता एक लोकप्रिय गायिका आहे. माझी पत्नी नोकरी करते आणि माझी लहान मुलगी शिकते. ते नेहमी बोलतात की, तुम्ही अमेरिकेत या. पण माझे मुंबईसोबत वेगळे नाते आहे. जेव्हा तब्येत ठीक नसेल तेव्हा तर जावेच लागेल. पण मुंबईला मी खूप मीस करणार.

ते पुढे म्हणाले की, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जान कुमार सानू बिग बॉसमध्ये गेला होता आणि त्याने त्यावर लक्ष द्यावे. तो एक चांगला मुलगा आहे. नेहमी मोठयांचा तो सन्मान करतो. रिताजीने जानला चांगले संस्कार दिले आहेत. पण राहुल त्याला पुन्हा पुन्हा ही आठवण का करून देत आहेत की, त्याचे पालक वेगळे झाले आहेत? एखाद्याच्या भावनांसोबत खेळणे चुकीचे आहे. मला विश्वास आहे की, राहुलचे आई-वडील हे समजू शकतील. राहुल एक चांगला गायक आहे. तोही माझ्या मुलासारखा आहे. पण माहीत नाही तो असे का बोलत आहे. कदाचित टीआरपीसाठी तो असे करत असेल.

Loading RSS Feed