रिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या

resume
नोकरी मिळवायची म्हटली तर आपला बायोडाटा किंवा रिझ्यूम व्यवस्थित तयार केलेले असले पाहिजे. परंतु काही विद्यार्थी त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात. त्यामुळे अन्य अनेक चांगल्या पात्रता अंगी असूनही त्यांना नोकरी मिळू शकत नाही. त्यांनी रिझ्यूम तयार करण्याच्या बाबतीत दक्षता घेतली तर त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळणे सोपे जाते. तो तयार करताना विद्यार्थी काही नेहमीच्या चुका करतात आणि काही गोष्टींची दक्षता बाळगत नाहीत. त्या त्यांनी बाळगल्या पाहिजेत. आपण नोकरीसाठी जिथे अर्ज करतो तिथे हजारो अर्ज आलेले असतात आणि त्या हजारो अर्जांतून काही शे अर्ज त्यांना मंजूर करायचे असतात. म्हणून आलेल्या रिझ्यूमची प्रारंभिक पडताळणी किंवा छाननी ही यांत्रिक पद्धतीने होत असते. त्यामुळे आपल्या रिझ्यूममध्ये काही तांत्रिक चुका असतील तर या छाननीत आपला अर्ज बाद होऊ शकतो.

काही कंपन्यांमध्ये काही कीवर्ड निश्‍चित झालेले असतात आणि त्यांच्या आधारे आपल्याला आपली माहिती द्यावी लागते. डोमेन एरिया, स्कील्स्, डेसिग्नेशन असे ते विशिष्ट शब्द असतात. त्याच्या आधारे पहिली छाननी होते. रिझ्यूमची छाननी करताना पहिल्या सहा सेकंदात तिथले कर्मचारी तीनच गोष्टी प्राधान्याने बघत असतात. एक – हा उमेदवार आता कोठे आहे? दोन – या पूर्वीच्या त्याने काम केलेल्या दोन कंपन्या कोणत्या? त्या कंपन्यात तो कोणत्या पदावर काम करत होता? आणि तीन – त्याची शैक्षणिक पात्रता काय? या तीन गोष्टी ती नवी नोकरी मिळविण्यासाठी आपल्याकडे आहेत हे अर्जातून पटकन दिसले पाहिजे.

काही विद्यार्थ्यांना रिझ्यूम टाईप करताना उगाचच चित्र विचित्र ङ्गॉंट वापरण्याची सवय असते. हा सोस टाळला पाहिजे. ङ्गार अलंकारिक ङ्गॉंट न वापरता टाईम्स रोमन किंवा एरियल यासारखा व्यवहारात नेहमी वापरला जाणारा ङ्गॉंट वापरला पाहिजे आणि त्यात सुद्धा ङ्गार बारीक अक्षरात टाईप न करता बारा ते चौदा पॉईंट ङ्गॉंट साईज वापरला पाहिजे. दोन ओळीतले अंतर सुद्धा योग्य ठेवले पाहिजेत. आपल्या रिझ्यूममध्ये निरनिराळ्या प्रकारचे ग्राफ्स्, टेबल्स्, चित्रे, छायाचित्रे, स्पेशल इङ्गेक्टस् दाखविणारे ग्राङ्गिक्स हे टाळले पाहिजे. रिझ्यूम टाईप करताना स्पेलिंगच्या चुका करता कामा नयेत.

Leave a Comment