चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी…

nose
पावसाळ्याच्या दिवसात आणि नंतरच्या हिवाळ्यात सुद्धा कधी तरी फार सर्दी झालेली नसतानाही अचानकपणे झोपेत नाक बंद होऊन जाते. त्याला नाक चोंदणे असे म्हणतात. नाक चोंदले की, नाकाने श्‍वास घेता येत नाही आणि तोंडाने श्‍वास घ्यावा लागतो आणि काही निमित्ताने तोंड बंद झाले की श्‍वास बंद होतो आणि नाक चोंदलेली व्यक्ती श्‍वास बंद होण्याच्या कल्पनेने अस्वस्थ होऊन जाते.

नाक चोंदणे ही एक सामान्य तक्रार आहे. नाकाच्या आतील किंवा श्‍वसन यंत्रणेच्या वरच्या भागातील तापमान कमी झाले की, नाक चोंदले जात असते. त्यामुळे त्याच्यावर फार भारी इलाज करण्याची गरज नाही. अगदी सामान्य उपायांनी बंद झालेले नाक मोकळे होऊ शकते.

भरपूर आले टाकलेला चहा, पेपरमिंट टी किंवा गरम सूप प्राशन केले म्हणजे नाक मोकळे होते. ऍरोमा थेरपीने सुद्धा नाकातले ब्लॉकेज खुले करता येते. त्यावर आणखी एक सोपा उपाय म्हणजे गरम गरम पाण्याने डोक्यावर आंघोळ करणे किंवा स्टीम बाथ घेणे. नाक चोंदल्यानंतर भरभर चालत गेलो तरी नाकातला मेगा ब्लॉक मोकळा होऊ शकतो.

नाकपुड्यातील तापमान वाढेल असे काहीही केले तरी चोंदलेले नाक बरे होते. त्यासाठी काही स्प्रे सुद्धा मिळतात. मात्र याबाबतीत एक अडचण येते. नाक चोंदले आहे याची जाणीव झोपल्यावर होते. झोपेलेल्या व्यक्तीचे नाक तरी चोंदलेले असते पण झोपेतून उठायचे नसते. अशा व्यक्तीने डोक्याखाली एकच्या ऐवजी दोन उशा घेऊन उताणे झोपले तरी चोंदलेले नाक मोकळे होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment