चिपांझींचा असतो स्वतःचा शब्दकोश

chimp
जंगली चिपांझी माणसाच्या खूप जवळचा आहे आणि तो माणसाप्रमाणेच भाव भावना व्यक्त करू शकतो असे नुकत्याच झालेल्या संशोधनातून दिसून आले आहे. चिपांझी संवादासाठी स्वतःच खास शब्दकोश वापरतात तसेच भावभावना व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या हालचाली करतात असे युगांडातील चिपांझींवर करण्यात आलेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन करंट बायॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

चिपांझी हा मानवाचा पूर्वज असावा असा अनेक संशोधकांचा दावा आहे. माणूस ज्याप्रमाणे भावभावना व्यतक्त करतो, संवादासाठी भाषा वापरतो तशीच वर्तणूक चिपांझीही करतात. डॉ.कॅथरिन यांच्या म्हणण्यानुसार चिपांझींची संवादाची एक पद्धत आहे आणि त्याद्वारे ते १९ प्रकारच्या संदेशांची देवाणघेवाण करू शकतात. तसेच ६६ प्रकारच्या भावना व्यकत करू शकतात.

उदाहरणादाखल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गरम कॉफीचा कप तोंडाला लावला तर चिपांझी भाजल्याचा संदेश विशिष्ट प्रकारच्या चित्कारातून देतात. एकमेकांचा सहवास हवा असेल तर त्याचा संदेश झाडाचे पान तोडून त्याचा एक तुकडा खातात. दूर हो, अंगावर चढ अथवा करू नको असे सुचवायचे असेल तर हात मारल्यासारखे हलवितात. चिपांझी अशा हालचालीतून आपल्या पिलांना तसेच जोडीदारालाही संदेश देत असतात. अशा अनेक प्रकारच्या हालचाली विविध संदेशासाठी ते वापरतात असेही या संशेाधनातून दिसून आले आहे.

Leave a Comment