किया मोटर्स बनविणार अत्याधुनिक कॉम्बॅट वाहने

फोटो साभार न्यूज १८

किया मोटर्स या वर्षी मध्यम आकाराच्या स्टँडर्ड लष्करी वाहनांचा प्रोटोटाईप तयार करणार असून कोरियन सरकार या वाहनांच्या चाचण्या २०२१ मध्ये घेणार आहे. त्यानंतर २०२४ पासून ही वाहने कोरियन सैन्यात तैनात केली जाणार आहेत. कोरिया लष्कर आणि किया मोटर्स यांच्या संयुक्त गुंतवणुकीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोरियन सैन्यात वापरात असलेल्या २.५ टनी व ५ टनी सैन्य मानक वाहनात बदल करून नवीन ५ टनी बुलेट प्रूफ वाहने विकसित केली जात आहेत. या स्टँडर्ड हाय टॉर्क वाहनांना ७.० लिटर डिझेल इंजिन, ऑटो ट्रान्समिशन एबीएस व अँटी रिस्क रेग्युलेटर, रिअर पार्किंग असिस्टंट, अराऊंड व्हू मॉनीटर, सॅटेलाईट नेव्हिगेशन, अशी अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत.

या वाहनाचा वापर सैन्याबरोबर औद्योगिक व अंतराळ अश्या विविध क्षेत्रात केला जाणार असल्याचेही समजते. सैन्याच्या भविष्यातील लढाऊ प्रणालीचा विकास करण्यात किया सक्रीय योगदान देत आहे. अर्थात कियाने यापूर्वी कोरिया आणि अन्य देशांसाठी ०.२५, १.२५, २.५, ५ टनी अनेक वाहनांचे उत्पादन केले आहे. अशी नऊ मॉडेल्स कंपनीने बनविली असून आत्ता पर्यंत १,४०००० सैन्य वाहने बनविली आहेत. कोरियाचे बहुउद्देशीय युद्ध वाहन सुद्धा किया मोटर्सनेच बनविलेले आहे.