स्कॉटलंड मध्ये सापडली सोन्याची गुहा

स्कॉटलंड मधील राष्ट्रीय उद्यानात एका गुहेत सोन्याची खाण सापडली आहे. ही गुहा खूप जुनी आहे पण आजपर्यंत गुहेत कुणी गेलेलेच नव्हते असे समजते. जेव्हा या गुहेत प्रथमच काही लोकांनी प्रवेश केला तेव्हा त्यांचे डोळे आश्चर्याने फाटण्याची पाळी आली. ज्या भागात ही गुहा सापडली तो भाग पहाडी आहे आणि विराण आहे. या भागात अश्या अनेक गुहा आहेत असेही सांगितले जात असून त्या गुहातून अजून कुणी आत गेलेले नाही.

स्कॉटलंड सरकारने नोव्हेंबरपासून या सोन्याच्या गुहेतून व्यावसायिक पातळीवर सोने बाहेर काढण्याचा निर्णय घेतलं असून त्यासठी स्कॉटगोल्ड रिसोर्सेसला कंत्राट देण्यात आले आहे. या सोन्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास हातभार लागणार आहे शिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. कोनिश माईन नावाची ही गुहा ट्रॉप्स नॅशनल पार्क परिसरात मिळाली आहे. आता सरकारने या गुहेच्या आसपासच्या भागात सुद्धा सोने सापडू शकेल काय याचा तपास सुरु केला आहे.

नुकत्याच सापडलेल्या सोन्याच्या गुहेत अब्जावधी किमतीचे सोने साठे आहेत. येथील भिंतीतून सुद्धा सोने आहे. प्राथमिक अंदाजानुसार या सोन्याची किंमत २२ अब्ज २८ कोटींहून अधिक आहे. या सोन्यातील २५ टक्के सोन्याचे दागिने करून ते विकून त्यातून पैसे मिळविले जाणार आहेत. अनेकांनी हे सोने खरेदी करण्याची तयारी दाखविल्याचे सुद्धा सांगितले जात आहे.