मायक्रोमॅक्सच्या ‘इन’ स्मार्टफोनची पहिली झलक

मायक्रोमॅक्स नवीन ‘इन’ सिरीज स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत असल्याची चर्चा गेले काही दिवस होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने अखेरी ‘इन’ ची पहिली झलक सोशल मीडियावर टीझर सादर करून दाखविली आहे. त्याचबरोबर हे स्मार्टफोन ३ नोव्हेंबर रोजी लाँच होत असल्याचे म्हटले आहे. टीझर मध्ये रीयर पॅनल डिझाईन ब्ल्यू कलरच्या विविध कॉम्बीनेशन मध्ये दिसत आहे.

या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे फोनसाठी हिलिओ जी ३५ व हिलिओ जी ८५ प्रो प्रोसेसर दिला गेल्याचा उल्लेख आहे. मायक्रोमॅक्सच्या भारतीय बाजारातील वापसीमुळे शाओमी तसेच रिअल मी समोर आव्हान उभे राहील असे मानले जात आहे. जी ३५ प्रोसेसरचा वापर अनेक लोकप्रिय स्मार्टफोन मध्ये केला गेला असून त्यात नार्झो २०, रिअलमी नोटचा समावेश आहे त्याचबरोबर जी ८५चा वापर रिअलमी सी ११, रियलमी ९, पोको सिड मध्ये केला गेला आहे.

द मोबाईल इंडियनच्या माहितीनुसार ‘इन’ स्मार्टफोन सिरीज खाली दोन स्मार्टफोन येणार आहेत. पैकी जी ३५ प्रोसेसर साठी ६.५ इंची एचडी प्लस डिस्प्ले, २/३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, अँड्राईड ओएस, असेल. २ जीबी मॉडेल साठी १३ + २ एमपीच रिअर कॅमेरा तर फ्रंटला ८ एमपीचा कॅमेरा तसेच ३ जीबी मॉडेल साठी रिअरला १३+५+२ एमपीचा ट्रिपल कॅमेरा सेट आणि फ्रंटला १३ एमपी कॅमेरा असेल. या फोनच्या किमती ७ ते १५ हजार दरम्यान आहेत.