पॅरिसमधले ओन्ली गर्ल्स गॅरेज चर्चेत

garage
केवळ महिलांसाठी राखीव अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती असतात. उदाहरणार्थ रेल्वेतले डबे, प्रसाधनगृहे, खास महिलांची कपड्याची दुकाने, महिला बँका अशी ही यादी खूप मोठी आहे. त्यात आता फ्रान्समधील महिलांनी आणखी एक भर घातली आहे. पॅरिसमधील तरूणींनी एकत्र येऊन खास महिलांसाठी मोटर गॅरेज सुरू केले आहे आणि विशेष म्हणजे हे गॅरेज पॅरिसमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.

या तरूणींना गॅरेज काढावे असे का वाटले असेल असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर असे- पुरूष मॅकॅनिक महिलांना कधीच गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे पुरूष मेकॅनिककडून गाड्या दुरूस्त करून घेणे महिलांना नेहमीच त्रासदायक वाटते. एकतर महिलांना गाडी व्यवस्थित हाताळता येते यावरच पुरूषांचा विश्वास नसतो त्यामुळे गाडी बिघडली तर पुरूष मेकॅनिक फारश्या आस्थेने ती दुरूस्त करत नाहीत असा त्यांचा अनुभव असतो. या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी हे गॅरेज सुरू करण्यात आले आहे.

या गॅरेजमध्ये सर्व महिला मेकॅनिक आहेत. गॅरेजचे इंटिरियर सुंदर मेणबत्त्या, सुंदर वॉलपेपर्सनी सुशोभित केले गेले आहे शिवाय महिलांसाठी येथे ब्युटी कॉर्नरही आहे. त्यामुळे गाडी दुरूस्त होईपर्यंत त्या आपला मेकअप, कपडे ठीकठाक करू शकतात. या गॅरेजमध्ये काम करणार्‍या तरूणींनी तीन वर्षांची ऑटो मॅकॅनिक ही पदवी घेतली आहे आणि आपले काम त्या अतिशय उत्तमपणे पार पाडत आहेत. त्यामुळे या गॅरेजची प्रसिद्धी वेगाने वाढते आहे आणि आता तर चक्क पुरूषही या गॅरेजमध्ये गाड्या दुरूस्तीसाठी येऊ लागले आहेत. पुरूष ग्राहकांनाही आम्ही चांगली सेवा देतो आणि त्यांना गंभीरपणे घेतो असे या महिला मेकॅनिक सांगतात.

Leave a Comment