जगाची भूक भागविण्याची ताकद फणसात

fanas
जगभरातील नागरिकांना खाद्यसुरक्षा देऊ शकेल असे गुणधर्म फणसात असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हवाई येथील नॅशनल ट्रॅपिकल बोटॅनिकल गार्डन मध्ये डियान रेगान यांनी १९८० पासून सुरू केलेल्या फणसावरील संशोधनातून ही बाब समोर आली आहे. रेगान यांनी ३४ देशांतील फणसांच्या शेकडो जातींवर संशेाधन केले आहे. २००३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ब्रेडफ्रूट इन्स्टिट्यूटबरोबर सध्या त्यांचे संशोधन सुरू आहे.

जगभरात जेथे नागरिकांची उपासमार होत आहे त्याविरूद्ध लढण्यासाठी जगभर फणस लागवडीची योजना या संस्थेना हाती घेतली आहे. अलायन्स टू एंड हंगर या नावाने या संस्थेने हा उपक्रम चालविला आहे. संस्थेचे डॉ.जरेगा यांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरातील विविध ठिकाणचे पाणी, हवा, वातावरण कोणत्या जातींच्या फणसांना अधिक मानवते याचा शोध घेऊन तशाप्रकारच्या जाती लावल्या जाणार आहेत.३ किलोचा एक फणस पाच जणांच्या कुटुंबाची कर्बोदकांची गरज पुरी करू शकतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. फणसाच्या आठळ्यापासून जे पीठ मिळते त्याचा उपयोग अनेक प्रकारच्या मिठाया आणि अन्य पदार्थ करण्यासाठी करता येतो.

याचबरोबर फणसात प्रोटीनचे प्रमाणही चांगले आहे. सोयाबीनपेक्षाही अधिक प्रमाणात अमायनो आम्ले फणसात आहेत. तसेच फणसात जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाणही चांगले आहे. रोग पडू न शकणारी फणसाची रोपे संस्थेने तयार केली आहेत. या रोपांना दोन वर्षात फळे येतात. अशी ३५ हजार रोपे जगातील २६ देशांत पाठविली गेली असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment