गुगल सर्च इंजिनच्या मार्गात अॅपल सफारीचा खोडा

फोटो साभार क्लाऊड वर्ल्ड

कोणत्याही प्रश्नाचे त्वरित उत्तर हवेय मग गुगल सर्च करा हा आजचा परवलीचा शब्द बनला आहे. गुगल सर्च इंजिनची लोकप्रियता वादातीत आहे आणि या सर्च इंजिनने गुगलला किती पैसा मिळवून दिला हा चर्चेचा विषय आहे. मात्र आता गुगल सर्च इंजिनच्या सुसाट वेगात खोडा बनण्याची तयारी अॅपल इंक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयफोनसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या अॅपलने शांतपणे आणि गुप्तपणे गुगलच्या सुसाट वेगाला खोडा घालण्याची तयारी चालू केली असून त्यांचे सर्च इंजिन सफारी जगात लोकप्रिय ठरावे यासाठी जोमदार प्रयत्न सुरु केले आहेत.

टेक साईट WCCFTECH.COM च्या माहितीनुसार अॅपलने आयओएस १४ मध्ये बदल केला असून सर्व आयफोन ओएस मध्ये डीफॉल्ट सर्च सफारी देऊन जाहिरातीवर अतोनात पैसा खर्च केला जात आहे. गुगलला टक्कर देण्यासाठी अॅपल त्यांचे डेस्कटॉप, मोबाईल साठी स्वतंत्र सर्च इंजिन सुरवातीपासून देत आहेच पण त्याचा वापर फक्त अॅपल युजर्स करू शकत होते. गुगलची वाढती कमाई व जनमानसावरच्या वाढता प्रभाव पाहून अॅपल ने सर्व सर्वसमान्य युजर्स साठी सुद्धा सफारी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.