अक्षयच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव बदलले


ऐनवेळी अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेल्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे. या चित्रपटाच्या नावावरुन गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरु होता. पण या चित्रपटाचे नाव आता बदलून लक्ष्मी एवढेच ठेवण्यात आले आहे.


अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. अक्षय यात एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चित्रपटची रिलीज डेट इतक्या जवळ असताना निर्माते आता शीर्षक बदलतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading RSS Feed