२९ ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस

आज इंटरनेट अनेकांना जीवनावश्यक झाले असून विशेषत करोना काळात, लॉकडाऊन मध्ये इंटरनेटचा वापर समाजाच्या सर्व थरातील नागरीकांकडून मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. बिले भरणे, खरेदी, डॉक्टर सल्ला, शाळा, ऑफिसचे काम इतकेच नव्हे तर नव्याने सुरु झालेल्या स्टार्टअपनी सुद्धा त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी इंटरनेटचे सहाय्य घेतल्याचे दिसून आले आहे. या बहुपयोगी इंटरनेटची सुरवात २९ ऑक्टोबर १९६९ रोजी झाली होती आणि २९ ऑक्टोबर २००५ मध्ये इंटरनेट दिवस प्रथम साजरा झाला. २०१६ पासून जगभर इंटरनेट दिवस साजरा होऊ लागला.

लॉकडाऊन काळात इंटरनेट युजर्सची संख्या प्रचंड वाढलीच पण ऑनलाईन वेळेत सुद्धा लक्षणीय वाढ नोंदविली गेली. घरात बसूनच शाळा अभ्यास, ऑफिस वर्क, नवीन नोकरी शोध, आर्थिक व्यवहार, मनोरंजन आणि व्यापारासाठी इंटरनेटच्या खूप वापर केला गेला. याच काळात ब्रॉडबँड कनेक्शन मोठ्या प्रमाणावर घेतली गेली तसेच इंटरनेटने क्रिएटीव्हीटीचे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले.

इंटरनेटवर व्हिडीओ पोस्ट करण्याचे प्रमाण वाढले तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याशी जोडले राहण्यास खूप मदत मिळाली. जगात आज ७६६ कोटी इंटरनेट युजर्स असून त्यातील ७० कोटी भारतात आहेत. लोकसंखेच्या विचार केला तर ६० टक्के जनता इंटरनेटशी जोडली गेलेली आहे.