प्रथमच काश्मिरी शेतकरी सफरचंद विक्री ऑनलाईन करू शकणार

काश्मीर खोऱ्यात करोना आणि हवामान यांचे तडाखे सहन करावे लागणारा काश्मिरी शेतकरी यावर्षी प्रथमच सफरचंदाची ऑनलाईन विक्री करू शकणार आहे. फळविभागाने बुधवारी मार्केट इंटरव्हेंशन स्कीम म्हणजे एमआयएसची सुरवात केली असून प्रथमच सफरचंदाच्या गुणवत्तेप्रमाणे दर निश्चित करून दिले आहेत. समितीचे मुख्य एजाज अहमद भट या संदर्भात बोलताना म्हणाले, या वर्षी सफरचंद उत्पादन चांगले आहे. फळांची प्रत उत्तम आहे त्यामुळे चांगला बाजार हवा. गेल्या वेळी थेट विक्री करताना आमच्याकडून काही चुका झाल्या त्या यावेळी सुधारल्या गेल्या आहेत.

काश्मिरी सफरचंद उत्पादक शेतकरी प्रथमच त्याचा माल ऑनलाईन विकू शकणार आहे. त्यासाठी त्यांना साईटवर नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर ऑनलाईनवर विक्री करता येईल. कोणत्याही जवळच्या मंडी मध्ये माल नेता येईल. गतवर्षी किलोच्या भावाने विक्री केली होती यंदा पेटीच्या भावाने विक्री करता येईल. मालाचे पैसे शेतकऱ्याला लगोलग मिळतील.

जम्मू काश्म्रीर कृषी विभागाच्या माहितीनुसार येथे ३.४ लाख हेक्टर फळबागा क्षेत्र असून त्यातील ४८ टक्के क्षेत्रात सफरचंद उत्पादन घेतले जाते. ७ लाख कुटुंबांची उपजीविका त्यावर चालते. यंदा ए ग्रेड सफरचंद पाच पेटीच्या किलोसाठी २९५ रुपये, बी ग्रेडसाठी २१५, सी ग्रेडसाठी ११५ रुपये असे भाव निश्चित केले गेले आहेत.