ट्रम्प प्रचारात प्रथमच मेलेनियांची हजेरी

फोटो साभार टाईम्स ऑफ इस्रायल

अमेरिकेत येत्या ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी शेवटचे मतदान होत आहे. सध्याचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे कुटुंबीय विविध राज्यात प्रचारात सामील झाले आहेत. मात्र ट्रम्प यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलेनिया प्रथमच प्रचारसभेत सामील झाल्या आहेत. पेनसिल्वानिया येथील सभेत त्यांनी ट्रम्प यांचा प्रचार केला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझे पती हे खरे योद्धे, लढवय्ये आहेत. चार वर्षे त्यांनी देशाची सेवा केली आहे त्यांना आणखी एक संधी दिलीत तर ते अमेरिकेला मजबूत आणि समर्थ बनवतील. अमेरिकेवर ट्रम्प यांचे खूप प्रेम आहे. करोना संक्रमण काळात त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावून काम केले आहे. जवळच्या माणसाला मुकणे म्हणजे काय याची मला कल्पना आहे. आपण शांतपणे शिरकाव करणाऱ्या आणि अदृश्य शत्रूविरुद्ध युद्ध करतो आहोत. देशासाठी ही अडचणीची वेळ आहे. दिशाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती रोज देशाच्या नागरिकांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात आहेत असे दिसले आहे.

ऑगस्ट मध्ये जेव्हा दुसऱ्या वेळी डोनल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले गेले त्यावेळी झालेल्या परिषदेत मेलेनिया उपस्थित होत्या मात्र त्यानंतर त्या प्रथमच प्रचार करताना दिसल्या आहेत.