आयफोनची मोहिनी जबरदस्त

फोटो साभार फोर्ब्स

प्रीमियम फोन्स बनविणाऱ्या अॅपल इंकच्या आयफोनची जगावर किती प्रचंड मोहिनी आहे याचे प्रत्यंतर येत असून जगभरात कंपनीने १ अब्जाहून अधिक आयफोन विकले आहेत. अर्थात अमेरिका आणि युरोप सारख्या ठिकाणी त्यांची विक्री अधिक असली तरी आशिया खंडातील विकसित देश आणि भारतात सुद्धा आयफोनची मोहिनी जबरदस्त आहे. जगाची लोकसंख्या ७ कोटी धरली तर प्रत्येक ७ व्यक्ती मागे १ आयफोन धारक आहे असे दिसून आले आहे.

गेल्या दोन वर्षात भारत आणि आशियातील विकसित देशात आयफोनची विक्री जबरदस्त वाढल्याचे दिसून आले आहे. टेक अॅनालिस्ट नील सायबर्ट यांच्या मते गेल्या महिन्यात आयफोन १२ लाँच झाल्यावर ग्राहकांच्या संखेने १ अब्जचा आकडा पार केला आहे. त्यावरून आयफोनच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. हे फोन महाग आहेत तरीही ग्राहक त्यावर तुटून पडत आहेत. आयफोनची लोकप्रियता वाढती असून त्यामुळे त्याच्या किमती वाढत आहेत.

गेल्या दोन वर्षापासून कंपनीने त्याच्या विक्रीतील वाढ घट या संबंधीची माहिती जाहीर करणे बंद केले आहे. अर्थात सॅमसंग, शाओमी आयफोनला चांगली टक्कर देत आहेत. २००८ मध्ये पाहिला आयफोन आला आणि त्यावर्षी ११ दशलक्ष फोन विकले गेले. त्यानंतर हा आकडा वाढत गेला आणि  २०१२ मध्ये २०६ दशलक्ष तर २०२० च्या सप्टेंबर पर्यंत हा आकडा १ हजार दशलक्ष म्हणजे १ अब्जाहून अधिक झाला आहे.

Loading RSS Feed