शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर


आपण शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. कारण केवळ शेतीच नाही तर जगातली सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारली आहेत. शिवाय झालेली प्रगती सतत होत रहावी यासाठी नव्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे सुरूच आहे. शेतकर्‍यांनी मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडेल पण या प्रश्‍नाचे उत्तर फारसे अवघड नाही. तसा विचार केला तर आज ग्रीन हाऊसचा वापर होत आहे हे तंत्रज्ञानच आहे. या ग्रीन हाऊसमध्ये हवामान नियंत्रित केलेले असते. त्यामुळे त्याच्या बाहेर वातावरण कितीही वाईट असले तरीही या ग्रीन हाऊसमध्ये कधी दुष्काळ पडत नाही. उघडयावर केलेल्या शेतीपेक्षा या ग्रीन हाऊसमध्ये आठपट उत्पन्न जास्त होते.
https://www.useoftechnology.com/wp-content/uploads/2012/10/Use-of-technology-in-Agriculture-1.jpg
काही ठिकाणी पिकांना पाणी देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हजारो एकर जमिनीला पाणी दिले जाते पण त्या एवढया विस्तीर्ण क्षेत्रातल्या कानाकोपर्‍यात पाणी पोचले आहे की नाही हे एका खोलीत बसून संगणकावर पाहता येते. दारे धरण्यासाठी शेतात पायही टाकावा लागत नाही. तेही काम एका खोलीत बसून करता येते. अर्थात आपल्याला त्या तंत्रज्ञानाची फार गरज नाही कारण भारतात तेवढे मोठे शेतकरीच नाहीत. पण पिकांना पाणी देण्याच्या ठिबक सिंचनासारख्या पद्धती तंत्रज्ञानातूनच निर्माण झाल्या आहेत.

आपल्या हातात मोबाईल फोन आहे पण त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल याचाही आपण विचार केला पाहिजे. भारतामध्ये मोबाईल क्रांती झालेली आहे. देशाची लोकसंख्या १२० कोटी असली तरी देशामध्ये ८० कोटी मोबाईल ङ्गोन झालेले आहेत. याचा अर्थ जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल ङ्गोन आहे. हीच गोष्ट वेगळ्या शब्दात सांगायची तर असे म्हणता येईल की, भारतातले प्रत्येक कुटुंब आता मोबाईलधारक झालेले आहे. या मोबाईलद्वारे बसल्या जागी भारतात कोणाशीही संपर्क साधता येतो. त्यामुळे माणूस माणसाच्या जवळ आला आहे आणि माणसा-माणसातले अंतर कमी झाले आहे. माणसातले अंतर कमी झाले की, माणसांच्या विचारांची देवाण-घेवाण वेगाने आणि प्रभावीपणे होते आणि देवाण-घेवाण वाढली की, माणसाच्या प्रगतीची दारे मोकळी व्हायला लागतात.

आपण भारतामध्ये मोबाईलच्या वाढत्या संख्येचा असा वापर करायला शिकले पाहिजे. मोबाईल ङ्गोन बाळगणारे शेतकरी आपापसामध्ये आणि अन्य लोकांमध्ये संपर्क साधत असतीलच. परंतु या संपर्काला व्यावसायिक रुप दिले की, आपल्याला ङ्गायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी मोबाईलचा व्यावसायिक म्हणजे शेतीच्या तंत्रासाठी वापर व्हायला लागला की, त्याचा ङ्गायदा आपल्यालाही कसा घेता येईल याचा विचार करायला शिकले पाहिजे. तामिळनाडूमध्ये कोईमतूर येथे असलेल्या तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाने यादृष्टीने एक वेगळा उपक्रम योजिलेला आहे. या उपक्रमात शेतकर्‍यांना राज्यातल्या महत्वाच्या बाजारपेठातील महत्वाच्या कृषी मालाचे भाव दररोज कळविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी एक स्वतंत्र वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. तिचा पत्ता www.tnau.ac.in आणि www.agritech.tnau.ac.in असा असून email – info@tnau.ac.in असा आहे.

या विद्यापीठाने तामिळनाडूमधील १२ मोठ्या बाजारपेठांमध्ये आणि बंगलोरमध्ये आपले स्वतंत्र प्रतिनिधी नेमले आहेत. हे प्रतिनिधी दुपारी ११ वाजेपर्यंत त्या त्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव गोळा करतात आणि हे बाजारभाव विद्यापीठाच्या केंद्राकडे पाठवतात. विद्यापीठाच्या केंद्रात या बाजारभावांचे विश्‍लेषण करून ते सोप्या भाषेत शेतकर्‍यांना इंटरनेटवरून पाठवले जातात. म्हणजे आज राज्याच्या कोणत्या बाजारपेठेत सिमला मिरची महाग होती आणि कोणत्या बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कोसळलेले होते हे राज्यभरातल्या शेतकर्‍यांना दुपारी १ वाजता सोप्या भाषेत कळते. त्या दिवशी तो शेतकरी आपल्या शेतातला कोणता माल कोणत्या बाजारपेठेत नेऊन विकायचा याचा निर्णय करू शकतो. त्याचा ङ्गायदा अनेक शेतकर्‍यांना झालेला आहे. ही माहिती इंटरनेटवरून मिळते. पण प्रत्येक शेतकर्‍याकडे इंटरनेट नाही. मोबाईल मात्र आहे. त्यामुळे ही माहिती प्रत्येकाला मिळावी यासाठी ती आता मोबाईल ङ्गोनवरून एस.एम.एस. द्वारा पाठविण्याची सोय केलेली आहे. त्याचा ङ्गायदा शेतकर्‍यांना होत आहे. हरियानामध्येही अशाच प्रकारे हॅन्डीगो लिमिटेड या कंपनीने शेतकर्‍यांसाठी एस.एम.एस. सेवा सुरू केलेली आहे. या सेवेतून केवळ बाजारभावच नव्हे तर हवामानाचा अंदाज, पिकांची माहिती, लागवडीचे टाईमटेबल, पीक संरक्षणाचे उपाय, पॅकींगच्या पद्धती आणि शेती मालाचे मार्केटिंग करणार्‍या कंपन्यांची माहिती हीही दिली जायला लागली आहे.

महाराष्ट्रात नोकिया कंपनीने अशा प्रकारचे उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमातून शेतकर्‍यांसाठी उपयुक्त अशी माहिती देवनागरी लिपीतून देण्याची सोय केली आहे. अशा प्रकारच्या सोयी शेतकर्‍यांच्या ङ्गायद्याच्या असतात. शेतकर्‍यांनी आपल्याकडे मोबाईल ङ्गोन नसेल तर तो घेतला पाहिजे आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी या सोयींचा ङ्गायदा घेतला पाहिजे. सर्वच खेड्यांमध्ये इंटरनेट नसते. पण इंटरनेट म्हणजे काही ङ्गार अवघड गोष्ट नाही. ती नसेल तर तीही प्राप्त केली पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती करता येते आणि अशी प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या आयुष्यात ई चौपाल या वेबसाईटने ङ्गार मोठी क्रांती केलेली आहे.

Leave a Comment