मलेरियापासून बचाव करण्यासाठी


परतीच्या पावसाळामुळे अनेक ठिकाणी अद्याप पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यात डास होतात आणि मलेरिया होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मलेरियापासून काय इलाज करावा असा प्रश्‍न पडतो. मलेरिया हा विकार प्लास्मोडियम या परोपजीवी विषाणूंपासून होतो. हे सर्वांना माहीत आहे. या परोपजीवी विषाणूंनी ज्यांच्या शरीरात प्रवेश केलेला आहे ते मच्छर आपल्याला चावले की मलेरिया होतो. हे डास शक्यतो सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या काळातच चावतात.

मलेरियाने पूर्वी फार लोक मरत असत पण आता बचाव करायचे उपाय सापडले असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु मृत्यू टाळण्यासाठी किंवा तब्येतीत काही गुंतागुंत होऊ नये यासाठी काही पथ्ये पाळण्याची गरज असते. अर्थात, ही सारी पथ्ये वयानुसार त्याचबरोबर पेशंटच्या अवस्थेननुसार बदलत असतात. त्याशिवाय कोणत्या प्रकारचा मलेरिया झालेला आहे. यावरही ते अवलंबून असते.

मलेरियावर औषधे हा तर इलाज आहेच परंतु काही रोगजंतू औषधालाही दाद देत नाहीत आणि ही एक मोठी समस्या होऊन बसलेली आहे. असे रोगजंतू माणसाच्या यकृतात प्रवेश करतात आणि तिथे काही गुंतागुंती निर्माण करतात. तेव्हा त्यांना यकृतातून बाहेर काढणे गरजेचे असते. त्यासाठी खालील पाच उपाय करावेत.

निसर्गोपचारानुसार लिंबाच्या १ ग्लास सरबतात चुन्याच्या निवळीचे चार ते पाच थेंब टाकावेत आणि हे मिश्रम ढवळून घ्यावे. ते प्राशन करावे. दालचिनीची पावडर एक चमचाभर घ्यावी, एक चमचा मध घ्यावा आणि त्यात मिरपूड मिसळावी हे मिश्रण पाण्यात टाकून विरघळून घ्यावे आणि ते अधूनमधून थोडे थोडे प्यावे.

तुळस ही पवित्र वनस्पती मानली जाते आणि तिची पाने मलेरियावर औषध म्हणून गुणकारी ठरतात. तुळशीच्या मंजिर्‍या ह्याही औषधी असतात. अधुनमधुन तुळशीची पाने चावून खाणे आणि तुळशीचे बी पाण्यात टाकून त्याचा काढा करून पिणे. द्राक्ष हे फळसुध्दा मलेरियावर उपयोगी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment