मुंबईकर भरत आहेत पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी कर – नितेश राणे


मुंबई – मुंबई महानगरपालिकेला शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यामधील वादामुळे ८२ लाख ५० हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. कराच्या रूपात सर्वसामान्य मुंबईकरांना महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा केलेली ही रक्कम कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी खर्च करण्यात आले आहेत. ही माहिती माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून निशाणा साधला आहे.


त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करत मुंबईकर भरत आहेत पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी कर. आता आता यांच्या मुलांची लग्नही आपण भरलेल्या कराच्या पैशातूनच होतील असे वाटत असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी टीका केली.