अननसाचे आरोग्याला फायदे


अननस हे दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणारे फळ आहे. त्याला विविध भाषात निरनिराळी नावे असली तरी साधारणतः पाईनॅपल या नावाने ते चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. उन्हाळ्यामध्ये पाईनॅपलचे बरेच फायदे होतात. विशेषतः घामातून जाणारे आपल्या शरीरातले पोषण द्रव्य पाईनॅपलमुळे भरून येते. पाईनॅपल हे फळ कर्करोग प्रतिबंधकसुध्दा आहे. त्यातील घटकांचा उपयोग हृदयविकार आणि पचनाचे विकार दुरूस्त करण्याससुध्दा होऊ शकतो. पाईनॅपलचे काही खास उपयोग खालीलप्रमाणे आहेत.

पाईनॅपलमध्ये मँगनिजचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे पाईनॅपल खाणार्‍याच्या हाडांची मजबुती वाढते. दररोज एक ग्लास पाईनॅपल ज्युस पिणार्‍यांचे दात आणि हिरड्या मजबूत होतात. पाईनॅपलमध्ये बिटा केरोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराची झीज होण्याचा वेग कमी होतो.

पाईनॅपलला बिटा केरोटीनचे पॉवर हाऊस म्हटले जाते. त्यात फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि उष्मांक कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास पाईनॅपल उपयुक्त ठरते. पाईनॅपल खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होतात. शरीराच्या सर्व अवयवांना जोम प्राप्त होतो. केस, त्वचा आणि नखे यांची झळाळी पाईनॅपलमुळे वाढते.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment