झाडावरून तोडून खा गुलाबजामुन


निसर्ग कोणते चमत्कार घडवेल याचा अंदाज करणे हे मानवी बुद्धीच्या पलिकडचे आहे. झारखंडमध्ये असाच एक चमत्कार घडला आहे. लोहरदगा लातेहार गावातील गौतम भारती यांच्या घरासमोर असलेल्या झाडाला गुलाबजाम लागतात. गुलाबजामुन म्हणजे आपण खव्याचे गुलाबजामुन खातो ते नव्हे तर एक प्रकारचे हे फळ आहे आणि त्याची चव थेट गुलाबजामसारखी आहे.

हे झाड भारती यांच्या आजोबांनी लावले आहे आणि गौतम ते पूर्वजांची निशाणी म्हणून जपतातही. या झाडाच्या फळांपासून त्यांना चांगली आर्थिक कमाईही होते. या झाडाला फेब्रुवारीमध्ये फळे धरतात. फळे गोल पेरूसारखी असून त्याचा रंगही पिवळसर हिरवा आहे. एप्रिलच्या सुमारास ही फळे पिकतात आणि ती बाजारात नेली की ताबडतोब ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडते.१०० ते १५० रूपये किलोने ही फळे विकली जातात

या फळाच्या आत एकच बी असते. ती खाल्ली जात नाही. फळाचा गरच खाल्ला जातो आणि तो अगदी गुलाबजामासारखा लागतो. अशा प्रकारची झाडे अन्य कोठे आहेत वा नाही याची कांहीही माहिती मिळत नाही असेही समजते.

Loading RSS Feed

Leave a Comment